महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला दिनानिमित्त नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वेची जबाबदारी दिली महिलांना - नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वे

जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे चालवण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग हे नांदेड रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

Nanded-Aurangabad Special Train
नांदेड-औरंगाबाद विशेष रेल्वे

By

Published : Mar 7, 2020, 2:52 PM IST

नांदेड - 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होत आहे. यानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने महिलांसाठी नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे चालवण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे चालवण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिली

यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग हे नांदेड रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. चालवण्यात आलेल्या या विशेष रेल्वेमध्ये निधी सिंग यांनी वरिष्ठ लोकोपायलटची भूमिका बजावली. वरिष्ठ तिकीट कलेक्टर मरियम, उज्ज्वला, वर्षा साळवे यांनी प्रवाशांच्या तिकीट तपासणीची जबाबदारी घेतली.

हेही वाचा -महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'

रेल्वे सुरक्षा बलाच्या कॉन्स्टेबल आरती वटाणे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. महिलांच्या या विशेष रेल्वेला मधुबाई, सुनिता कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना गेले. या गाडीचे पूर्णा, परभणी, जालना आणि औरंगाबादमध्ये स्वागत करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details