नांदेड - तपास यंत्रणांनी PFI कार्यकर्त्यांवर छापेमारी केली होती. नांदेडमध्येही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने अटक केली होती. तसेच एक कार्यकर्ता फरार होता. अखेर सोमवारी नांदेड एटीएसने PFI चा फरार कार्यकर्ता मोहंमद आबेदला याला अटक केली आहे.
नांदेड एटीएसने PFI चा फरार कार्यकर्ता मोहंमद आबेदला केली अटक - नांदेड पीएफआय कार्यकर्त्याला अटक
तपास यंत्रणांनी PFI कार्यकर्त्यांवर छापेमारी केली होती. नांदेडमध्येही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने अटक केली होती.
याआधी परभणीतून चार जणांना अटक केली होती. त्यानंतर नांदेड एटीएसने पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले. मुख्य न्यायाधीश कीर्ती जैन देसरडा यांनी या पाचही जणांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते. या प्रकरणाशी संबंधित असलेला व फरार झालेला नांदेडचा मोहम्मद अबेदअली महेबूबअली (वय२६ ) याला देगलूर नाका भागातून सोमवार (दि.२६) अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी नांदेड न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी दिली.