महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हे' अधिकारी फेसबुकवरून साधणार नागरिकांशी संवाद - नांदेड जिल्हा प्रशासन फेसबुक लाईव्ह

कोविड -१९ च्या आव्हानात्मक काळात सरकार आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक

By

Published : Jun 2, 2020, 2:27 PM IST

नांदेड - टाळेबंदीचे नियम आणखी शिथिल होत असताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त आज एकत्र फेसबुकद्वारे नागरिकांशी साधणार सवांद साधणार आहेत.

कोविड -१९ च्या आव्हानात्मक काळात सरकार आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व जनतेने समर्थ साथ दिल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे. शेतकरी, कष्टकरी व कामगारांना व समाजातील सर्वच घटकांना सावरण्याची आहे. अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात, याची कल्पना असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आज सायंकाळी ६ वाजता संवाद साधणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

नागरिकांना हा संवाद‌ https://www.facebook.com/Dr.VipinltankarIAS/ या फेसबुक पेजवर साधता येईल.

जिल्ह्यात कठोर संचारबंदी -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार 1 जूनपासून पुढील आदेशापर्यंत फौजदारी कलम 144 (1) (3) अन्वये लागू करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. याचबरोबर आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिने केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटीपार्लर चालू ठेवण्यासाठी दिलेली मुभा रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details