नांदेड - माहूर तालुक्यातील तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुपटी-इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद कासिम शेख कादरूद्दीन (35, रा. गोकुंदा, तालुका किनवट) आणि, करण मारुती पिटलेवाड (30, रा. किनवट) अशी मृतांची नावे आहेत. तर, भास्कर तेलगराव सिडाम (22, रा. मांडवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, दोघांचा मृत्यू एक जखमी - करण मारुती पिटलेवाड
कुपटी-इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत हा अपघात झाला. सय्यद कासिम शेख कादरूद्दीन (35, रा. गोकुंदा, तालुका किनवट) आणि करण मारुती पिटलेवाड (30, रा. किनवट) अशी मृतांची नावे आहेत. तर, भास्कर तेलगराव सिडाम (22, रा. मांडवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
nanded accident news
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर (वाहन क्रमांक एम.एच. 26 के 5472) तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जात होता. रस्ता सोडून ट्रॉली व ट्रॅक्टरचे हेड नाल्यात पडल्याने, चालक व मजूर जागीच ठार झाले आहेत. तर, एक मजूर गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला इवळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठवण्यात आले.