नांदेड - नागपूरहून नांदेडकडे येत असलेल्या शिवशाही बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस नामफलकावर धडकल्याने ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड ते अर्धापूर मार्गावर आज पहाटे 5.45 वाजता घडली.
नांदेडमध्ये शिवशाही बसचा अपघात; चार प्रवासी गंभीर जखमी - शिवशाही बसचा अपघात
शिवशाही बसवरील ताबा सुटल्याने बस किलोमीटरचे अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
शिवशाही बस
शिवशाही बस (क्र.एम.एच.06 बी.डब्ल्यू.0813) प्रवाशांना घेऊन नागपूरहून नांदेडला येत असताना पिंपळगाव फाटा जवळील दशमेश हॉटेलसमोर आली असता, बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस किलोमीटरचे अंतर दर्शविणाच्या फलकावर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात राम कृष्णराव ढोरे (वय 49), श्याम कृष्णराव ढोरे (वय 53)नामदेव कावळे (वय 29) रा.नागपूर, कैलास शेळके रा.चिंचोली दिग्रस हे गंभीर जखमी झाले आहेत.