नांदेड -नगरपंचायत निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी गड राखला असून ५१ पैकी ३३ जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत. अर्धापूर, माहूर आणि नायगाव तीन नगरपंचायतच्या 51 जागेपैकी काँग्रेस- 33, राष्ट्रवादी- 8, भाजप- 3, सेना- 3 एमआयएम- 3 आणि अपक्ष-एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. नायगाव व माहूर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगलीच सरशी झाली आहे.
अर्धापूरमध्ये काँग्रेसचे संख्याबळ कायम -
अर्धापूर नगरपंचायतची निवडणूक पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. गत निवडणुकीत काँग्रेस-१०, राष्ट्रवादी-४, अपक्ष-१, एमआयएम-२ असे पक्षीय बलाबल होते. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. धर्मराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस-भाजपा-एमआयएममध्ये मुख्य लढत होती. पालकमंत्री सर्व शहर पिंजून काढले होते. यात कॉंग्रेसच्या जागा जरी वाढल्या नसल्या तरी सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेस-१०, एमआयएम-३, भाजपा-२, राष्ट्रवादी-१, अपक्ष-१ असे उमेदवार निवडून आले आहेत.
वॉर्ड क्र-1 शालिनी राजेश्वर शेटे (काँग्रेस ), वॉर्ड क्र-२ बाबुराव लंगडे (भाजपा ),वॉर्ड क्र-३ शेख जाकेर(राष्ट्रवादी), वॉर्ड क्र-४ डॉ.पल्लवी विशाल लंगडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-५ कान्होपात्रा प्रल्हाद माटे (भाजपा), वॉर्ड क्र-६ सोनाजी सरोदे (काँग्रेस), वॉर्ड क्र-७ छत्रपती उर्फ पुंडलिक कानोडे (काँग्रेस), वॉर्ड क्र-८ वैशाली प्रवीण देशमुख (काँग्रेस), वॉर्ड क्र-९ मिनाक्षी व्यंकटी राऊत (काँग्रेस), वॉर्ड क्र-१० मुख्तेदर खान पठाण (अपक्ष), वॉर्ड क्र-११, साहेरा बेगम काजी (काँग्रेस), वॉर्ड क्र-१२ यास्मिन सुलताना मुसब्बीर खतीब (काँग्रेस), वॉर्ड क्र-१३ मिर्झा शहबाज बेग(एमआयएम), वॉर्ड क्र-१४ रोहिणी इंगोले (एमआयएम), वॉर्ड क्र-१५ आतिख रेहमान (एमआयएम), वॉर्ड क्र-१६ सलीम कुरेशी (काँग्रेस), वॉर्ड क्र-१७ नामदेव सरोदे (काँग्रेस)
नांदेडमध्ये भाजपच्या मतदारसंघातही काँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी माहूर नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू स्थिती - माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार भीमराव केराम आहेत. पण भाजपा मात्र आपली कुठलीही जादू दाखवू शकली नाही. माहूर नगरपंचायत त्रिशंकु परिस्थिती नगरपंचायतील एकूण १७ प्रभागाच्या निवडणुकीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर झाला. यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी दोन पक्ष एकत्र येण्याची गरज असून शिवसेनेच्या उमेदवाराना येणाऱ्या काळात महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. एकूण १७ प्रभागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ७ जागा, काँग्रेस पक्षाला ६ जागा तर शिवसेनेला ३ जागा व भाजपाला १ जागेवर विजय मिळविता आला . यात प्रभाग क्र . १ मध्ये भंडारे विलास बालाजीराव ( काँग्रेस ) प्रभाग क्र . २ ) सौ . जाधव अशाताई निरधारी ( शिवसेना ) प्रभाग क्र . ३ ) कांबळे नंदा रमेश ( काँग्रेस ) प्रभाग क्र . ४ ) कामटकर विजय शामराव ( शिवसेना ) प्रभाग क्र . ५ ) सारिका देविदास सिडाम ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्र . ६ ) सौदागर मसरत फातिमा अब्दुल रफिक ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्र . ७ ) केशवे राजेंद्र नामदेवराव ( काँग्रेस ) प्रभाग क्र . ८ ) सौंदलकर कविता राजू ( काँग्रेस ) प्रभाग क्र . ९ ) सय्यद ( राष्ट्रवादी ) प्रभाग शकिलाबी शब्बीर ( राष्ट्रवादी ) क्र . १० ) शेख लतिफा मस्तान ( काँग्रेस ) प्रभाग क्र . ११ ) लाड ज्ञानेश्वर नारायण ( शिवसेना ) प्रभाग क्र . १२ ) राठोड सागर विक्रम ( काँग्रेस ) प्रभाग क्र . १३ ) महामुने सागर सुधीर ( भाजपा ) प्रभाग क्र . १४ ) शेख आसिफाबी शेख इमाम ( काँग्रेस ) प्रभाग क्र . १५ ) फिरोज कादर दोसानी ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्र . १६ ) खडसे अशोक कचरु ( राष्ट्रवादी ) प्रभाग क्र . १७ ) पाटील शीला रणधीर ( राष्ट्रवादी ) यांना विजय मिळला आहे.
नायगावात भाजपच्या हाती भोपळा -
नायगाव मतदारसंघात भाजपाचे आ.राजेश पवार हे नेतृत्व करतात. पण निवडणूकीत त्यांचे उमेदवारांना कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या हाती भोपळा आला आहे. नायगाव नगर पंचायत निवडणूकीत काँग्रेस व भाजपामध्ये सरळ लढत झाली. यात कॉंग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण आपली सत्ता कायम ठेवत विरोधकांना भोपळाही ही फोडू दिला नाही. प्रारंभी कॉंग्रेसचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित १४ प्रभागासाठी काँग्रेस व भाजपामध्ये सरळ लढत होऊन मतदारांनी भाजपाचा साफ करत काँग्रेसला सत्ता दिली. प्रभाग १ मधुन आशाताई हानंमत बोईनवाड , प्रभाग २. मधुन शरद दिगांबर भालेराव प्रभाग ४ मधुन सुधाकर पुंडलिकराव शिंदे, प्रभाग ६ मधुन मीनाताई सुरेश पा. कल्याण, प्रभाग ७ मधुन खजरी हाजीसाब सय्यद, प्रभाग १० मधुन दयानंद इरबा भालेराव, प्रभाग ११ मधुन विठ्ठल लक्ष्मण बेळगे, प्रभाग १२ मधुन माजी उपनगरध्यक्ष विजय पा. चव्हाण, प्रभाग १३ मधुन अर्चनाताई संजय पा.चव्हाण, प्रभाग १४ मधुन काशीबाई गंगाधर मद्देवाड, प्रभाग १५ मधुन ललीताबाई भालेराव , प्रभाग १६ मधुन पंकज हानंमत राव पा. चव्हाण, प्रभाग १७ मधुन मरियनबी नजीरसाब शेख कॉंग्रेस चे चौदा उमेदवार निवडून आले तर प्रभाग ३ मधुन सुमनबाई सोनकांबळे, प्रभाग ८ मधुन विजय दत्तात्रय भालेराव, प्रभाग ९ मधुन गिताताई नारायण जाधव हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीचे पूर्ण निकाल -
1) अर्धापुर- एकूण 17 पैकी काँग्रेस-10, भाजप-2, एमआयएम- 3, राष्ट्रवादी- 1, अपक्ष- 1
2) नायगांव- 17 जागांपैकी 17 ही जागेवर काँग्रेस विजयी
3) माहूर- एकूण जागा-17 काँग्रेस-6, राष्ट्रवादी- 7 भाजप-1 सेना-3