महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये आज राहुल गांधींची जाहीर सभा - ASAHOK CHAVAN

नांदेडमध्ये सोमवारी राहुल गांधींची तर मंगळवारी होणार नितीन गडकरींची सभा.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही दिग्गज नेते करणार उमेदवारांचा प्रचार.... राहुल गांधींची नवा मोढ्यात तर गडकरींची मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर होणार सभा

राहूल गांधी आणि नितीन गडकरी

By

Published : Apr 14, 2019, 10:26 AM IST

Updated : Apr 15, 2019, 9:45 AM IST


नांदेड- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या टप्प्यात नांदेड मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दिग्गज नेते नांदेडमध्ये हजेरी लावत आहेत. आज (सोमवार) काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा होणार आहे. तर युतीच्या उमेदवार चिखलीकरांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मंगळवारी सभा घेणार आहेत.

राहुल गांधी यांची सभा सोमवारी सायंकाळी ५ वाजता नवा मोंढा भागातील मार्केट कमिटी मैदानावर होणार आहे. तर तर मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्यामुळे काँग्रेस व भाजप उमेदवारांच्या प्रचाराचे वातावरण ढवळून निघणार आहे. राहुल गांधी हे महापालिका निवडणुकीच्या काही महिने आधी २०१७ साली नांदेडला आले होते. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

Last Updated : Apr 15, 2019, 9:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details