महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन - पोलीस निरीक्षक

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूर शहरात मुस्लिम बांधवांच्यावतीने 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. बकरी ईदनिमित्त ईदगाहच्यासमोर मदत निधी संकलित करण्यात आली.

बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन

By

Published : Aug 12, 2019, 1:11 PM IST

नांदेड - सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माहूर शहरात मुस्लिम बांधवांच्यावतीने 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. बकरी ईदनिमित्त ईदगाहच्यासमोर मदत निधी संकलित करण्यात आली.

बकरी ईदनिमित्त ईदगाहसमोर पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलन

कोल्हापूर, सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. या पूरग्रस्तांना विविध स्तरातून मदतकार्य केले जात आहे. तर आज रोजी त्याग व बलिदानचे प्रतीक असलेल्या बकरी ईदनिमित्त माहूर शहरातील समस्त मुस्लिम बांधवांतर्फे पूरग्रस्तांसाठी 'चला देऊया मदतीचा हात' ही संकल्पना राबविण्यात आली. यावेळी नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह परिसरासमोर फिरोज दोसाणी मित्र मंडळाच्यावतीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत निधी संकलन करण्यात आली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहरवाल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, प्रा. भगवान जोगदंड पाटील, जमादार राठोड, मंडळ अधिकारी येरावार, तलाठी पेंटावाड, हाजी रउप सौदागर, पाशा भाई, जिया सर, नुर भाऊ, मझर गुरुजी, इम्रान सुरय्या, फैजल जखुरा, सप्पु दोसानी, इरफान सय्यद, जमीर सौदागर, मुजीब फारुकी, सोहेल शेख, फिरोज अली, अशपाक अकबानी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details