नांदेड - कंधार तालुक्यातील मुंडेवाडी येथे सरपंच पदाच्या निवडणुकीच्या कारणावरून एका वृद्धाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कंधार पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीवेळी पाठिंबा दिला नाही म्हणून बालाजी मुंडे या आरोपींनी गळा दाबून खून केला, अशी तक्रार बालाजी यांच्या पत्नी यमुनाबाई यांनी दिली होती.
नांदेडमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीच्या कारणावरून वृद्धाचा खून - Older man murdered on election of sarpanch
कंधार तालुक्यातील मुंडेवाडी येथे सरपंच पदाच्या निवडणुकीच्या कारणावरून एका वृद्धाचा खून झालची घटना घडली. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीच्या कारणावरून वृद्धाचा खून
संबंधीत तक्रारीनंतर सुभान केंद्रे, खंडू केंद्रे, ज्ञानोबा मुंडे, गोविंद केंद्रे, अमोल मुंडे, गोविंद मुंडे, धोंडीबा मुंडे, बबन मुंडे, नागनाथ मुंडे यांच्या जणांविरुद्ध कंधार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव करत आहेत.