नांदेड - तीक्ष्ण हत्याराने एका तरुणाची हत्या केल्याची घटना सिडको परिसरातील महात्मा गांधी हायस्कूल परिसरात घडली. बालाजी राठोड असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये तरुणाची हत्या, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मृत बालाजी हा काही मित्रांबरोबर घराबाहेर गेला होता. नंतर रात्री उशिरा तो सिडको परिसरातील महात्मा गांधी हायस्कूलसमोर गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. त्याच्या घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालाजी हा काही मित्रांबरोबर घराबाहेर गेला होता. नंतर रात्री उशिरा तो सिडको परिसरातील महात्मा गांधी हायस्कूलसमोर गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. त्याच्या घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी उजव्या डोळ्यात आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत पावल्याचे सांगितले.
बालाजी राठोड याचा भाऊ माधव राठोड यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात हे करीत आहेत.