महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हत्या करुन घराला कुलूप लावले, 11 दिवसानंतर घटना उघडकीस - nanded district latest news'

अकरा दिवसांपूर्वी हत्या झाल्यामुळे घराबाहेर दुर्गंधी पसरल्यामुळे परीसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिली.

Murder In Nanded, The incident unfolds after 11 days
हत्या करुन घराला कुलूप लावले, 11 दिवसानंतर घटना उघडकीस

By

Published : Mar 13, 2020, 3:28 AM IST

नांदेड -धर्माबाद शहरातील सरस्वती नगर मध्ये राहत असलेल्या सुनिता उर्फ मालनबाई नागोराव सुर्यवंशी (वय ५५ वर्ष) यांची अज्ञात व्यक्तीने हत्या करुन घराला कुलूप लावून पलायन केले. ही घटना अकरा दिवसांपूर्वीच घडली असल्याचे बुधवारी उघडकीस आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धर्माबाद शहरातील सरस्वती नगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुनिता उर्फ मालनबाई सुर्यवंशी राहत होत्या. सदरील महीलेचा तिच्याच घरात अज्ञात लोकांनी गळ्यावर धारधार शस्त्रानी वार करून हत्या केली. महिलेच्या हत्येचे नियोजन करून हत्या झाल्यानंतर तिला चटईवर झोपवून ती गावाला गेली असावी, असे भासावे म्हणून घराला कुलूप लावून आरोपी फरार झाले आहेत. अकरा दिवसांपूर्वी हत्या झाल्यामुळे घराबाहेर दुर्गंधी पसरल्यामुळे परीसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिली.

पोलीस निरीक्षक सोहन माछरे आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदरील घटनेचा पंचनामा केला. तसेच घटनास्थळी १२ मार्चला गुरुवारी दुपारी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील, पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस उप-निरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलीस उप-निरीक्षक कराड व पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन कसून चौकशी केली आहे. ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणावरून कली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. परंतु मारेकरीचा काही शोध लागला नाही. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

हत्या करुन घराला कुलूप लावले, 11 दिवसानंतर घटना उघडकीस

येथील ग्रामिण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करुन रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. शेख इकबाल यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सौ.वैशाली संजय शर्मा रा. खोबरागडे नगर नांदेड यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींवर कलम ३०२ ,२०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details