नांदेड - मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने आज मुंबईला जाणाऱ्या तपोवन आणि देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे.
मुंबईतील पावसाचा फटका मराठवाड्याला; देवगिरी अन् तपोवन एक्सप्रेस रद्द - nagaorao bhange
मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नांदेडकरांनाही बसला आहे. आज नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी आणि तपोवन एक्सप्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
![मुंबईतील पावसाचा फटका मराठवाड्याला; देवगिरी अन् तपोवन एक्सप्रेस रद्द](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3730624-1063-3730624-1562131089746.jpg)
मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि काल (मंगळवारी) मुंबई - पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे बऱ्याच गाड्यांवर परिणाम झाला आहे. यामुळेच ३ जुलै रोजी मुंबईला जाणाच्या गाडी क्र. १७६१८ नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस आणि गाडी क्र. १७०५८ सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई येथून नांदेडकडे येणाऱ्या गाडी क्र. १७६१७ मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्पेस आणि गाडी क्र. १७०५७ मुंबई ते सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस ठरल्याप्रमाणे आज रोजी धावतील, असेही रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.