महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेणारे मुखेडचे तहसीलदार बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह - nanded corona news today

आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी घेण्यात आलेल्या भरती दरम्यान मुखेडच्या तहसीदारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. कोविड केअर सेंटर मुखेड येथे ही भरती करण्यात आली होती. त्यासाठी तहसील कार्यालय मुखेड येथे मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

मुखेडचे तहसीलदार करोना पॉसिटिव्ह
मुखेडचे तहसीलदार करोना पॉसिटिव्ह

By

Published : Aug 7, 2020, 9:01 PM IST

नांदेड : मुखेडच्या तहसीलदारांचा बुधवारी रॅपिड अँटिजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तहसीलदारांनी मंगळवारी आरोग्य विभागातील कंत्राटी पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे मुलाखतीला गेलेल्या उमेदवारांतही धाकधूक वाढली आहे. तर, तहसीलदारांचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

मुखेड तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे. रुग्णांची संख्या पाहता सेवा देणारे कर्मचारी अपुरे होते. त्यासाठी तत्काळ भरती करणे आवश्यक होते. त्यासाठी देगलूर उपविभागाकडून जाहिरातदेखील काढण्यात आली होती. मंगळवारी, मुलाखतीदेखील पार पडल्या. दरम्यान मुखेड तहसीलदारांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. बुधवारी रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला. तहसीलदारच पॉझिटिव्ह निघाल्याने तहसील कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तहसीलदारांनी मंगळवारी आरोग्य विभागातील कंत्राटी पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे मुलाखतीला गेलेल्या उमेदवारांतही धाकधूक वाढली आहे.

मुखेड तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढला असून कोरोनाच्या रुग्णाची संख्या ३०० वर गेली आहे. आरोग्य विभागाची कंत्राटी पदासाठी भरती होती. या भरतीसाठी शेकडो विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. विद्यार्थ्यांच्या कागदपत्र तपासणीसाठी व मुलाखतीसाठी तहसीलदार यांच्यासह अनेक बड्या अधिका­ऱ्यांची उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे, तहसीलदारांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे अधिकाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. दरम्यान, तहसीलदारांच्या संपर्कातील चालक व शिपाई यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details