नांदेड -माहूर तालुक्यातील मौजे मलकागुंडा तांडा येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. दिपक राठोड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते महावितरणमध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात.
सध्या महावितरणच्यावतीने सर्वत्र वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम राबवली जात आहे. वरीष्ठ तंत्रज्ञ दिपक राठोड हे आपले सहकारी पवन कनाके यांच्यासह वीजबील वसुलीसाठी मलकागुंडा तांडा येथे गेले होते. नानू सवई राठोड हे आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे दिपक यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, नानू राठोड याने वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्याची मुले सुनिल नानू राठोड आणि पिंटू नानू राठोड यांनी तंत्रज्ञ दिपक राठोड यांना बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.