नांदेड- जिल्ह्यात आज मराठवाडा जनता विकास परिषदेची रेल्वे प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली. आगामी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती. विकासासाठी मराठवाड्यातील खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे.
मराठवाड्याच्या विकासाठी खासदारांनी एकत्र यावे - व्यंकटेश काब्दे - व्यंकटेश काब्दे नांदेड बातमी
विकासासाठी मराठवाड्यातील खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे. आगामी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.
रेल्वे मंत्र्यांशी बोलून प्रश्न सोडवू -
या बैठकीत मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांबाबत चर्चा झाली. बैठकीत खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून रेल्वेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मराठवाडा जनता विकास परिषद आणि रेल्वे अधिकारी यांच्यात आगामी संसद अधिवेशनाच्या दरम्यान बैठक घेऊ, असे देखील चिखलीकर म्हणाले. यावेळी खासदार चिखलीकर त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठवाड्यातील तसेच प्रामुख्याने नांदेड विभागातील सर्व रेल्वेचे प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.