नांदेड : नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसात ( The torrential rains in Nanded ) पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान ( Great loss to farmers ) झाले. आज सकाळपासून नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर ( MP Pratap Patil Chikhlikar ) यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत नांदेडचे उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर ( MLA Balaji Kalyankar ) आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीची खासदार प्रताप पाटील यांनी आज पाहणी केली.
अनेक गावांत जाऊन पाहणी : यावेळी त्यांच्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह प्रशासनातील सर्वच अधिकारी हजर होते. नांदेड जिल्ह्यातील निळा, दाभड आणि अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत जाऊन ही पाहणी करण्यात आली. यावेळी सर्वच विभाग प्रमुखांसह जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील प्रत्यक्षात नुकसान झालेल्या ठिकाणी पाहणी केली. दरम्यान, भाजप खासदार आणि शिंदे गटांचे आमदार कल्याणकर यांनी एकत्रित येत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी या दौऱ्यात दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तत्काळ मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.