नांदेड - येथील तृतीयपंथीयांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावतीने ही मदत गरजू तृतीयपंथीयांना देण्यात आली आहे.
खासदारांनी पाठवले तृतीयपंथीयांना जीवनावश्यक साहित्याचे किट...
जीवनावश्यक वस्तूच्या किटमध्ये गहू, तांदूळ, गोडेतेल, साखर , साबण अशा सर्वच वस्तूंचा समावेश आहे, महिनाभर पुरेल इतके हे सामान या किटमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. दरम्यान, खासदारांच्या वतीने बाला
लॉकडाऊनमुळे सध्या तृतीयपंथीय अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये यासाठी ही मदत देण्यात आली. या जीवनावश्यक वस्तूच्या किटमध्ये गहू, तांदूळ, गोडेतेल, साखर , साबण अशा सर्वच वस्तूंचा समावेश आहे, महिनाभर पुरेल इतके हे सामान या किटमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.
दरम्यान, खासदारांच्या वतीने बालाजी जाधव, अभिजित पाटील, सचिन देसाई यांनी ही मदत तृतीयपंथीयांकडे सुपूर्द केली आहे. समाजातील दुर्लक्षित अशा घटकालादेखील मदत होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.