नांदेड - जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांत पाणी पुरवठा सुरळीत करा. गरज असेल तेवढे टँकर पाठवा. येत्या ४ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात येतील, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते.
दुष्काळग्रस्त भागात ४ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करा - खासदार चिखलीकर - नांदेड
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बैठकीत बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणून येताच कामाचा सपाटा सुरू केला आहे. पहिल्यांदा जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारल्याने ते चांगलेच संतापले होते.