नांदेड - जर पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर शिवसेना स्टाईलने चोप देण्यात येईल, असा इशारा दम खासदार हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना दिला. खरीप पेरणी पूर्व हंगाम तोंडावर आलेला असताना सुद्धा अद्यापही हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाही. यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी पीककर्ज वाटपावर आक्रमक घेतली आहे.
शेतकरी पीककर्जापासून वंचित -
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यामध्ये प्रशासन आणि राष्ट्रीयकृत बँकांची नेहमीच उदासीनता दिसून येते. त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा पीककर्जापासून वंचित राहतो. परिणामी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागते. त्यामुळेच शेतकरी आणखी कर्जाच्या फेऱ्यात अडकतो. वेळेवर कर्ज वाटप न केल्याने पेरणी खोळंबते आणि परिणामी कर्जबाजारीपणा येतो. खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आलेला असताना अजूनही पीककर्ज वाटपासाठी बँक आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.