महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या भूकंपग्रस्त भागात खासदार हेमंत पाटील यांनी काढली अख्खी रात्र जागून - earthquake

भूकंपामुळे काही भागात झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार हेमंत पाटील यांनी केली. या दरम्यान प्रशासनाशी समन्वय साधत पाटील यांनी भूकंपामुळे घाबरलेल्या लोकांना दिलासा देण्याचे काम केले.

भूकंपग्रस्त भागात खासदार हेमंत पाटील यांनी रात्र जागून काढली

By

Published : Jun 22, 2019, 12:30 PM IST

नांदेड - भूकंपग्रस्त भागात खासदार हेमंत पाटील यांनी रात्र जागून काढली. हेमंत पाटीलांनी भूकंप झालेल्या किनवट आणि माहूर तालुक्यात रात्रभर दौरा करत लोकांच्या भेटी घेतल्या. पुन्हा भूकंप होईल या अफवेने लोक प्रचंड घाबरलेले होते. या लोकांना दिलासा देण्याचे काम खासदार पाटील यांनी केले. भूकंपामुळे काही भागात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. या दरम्यान प्रशासनाशी समन्वय साधत पाटील यांनी भूकंपामुळे घाबरलेल्या लोकांना दिलासा देण्याचे काम केले.

भूकंपग्रस्त भागात खासदार हेमंत पाटील यांनी रात्र जागून काढली

किनवट, माहूर हिमायतनगर शहरासह परिसरात २१ तारखेला (शुक्रवार) रात्री ९.१० च्या सुमारास भूकंपपाचा सौम्य धक्का जाणवला. रात्री अचानक आलेल्या भूकंपाच्या झटक्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे नागरिक आपले घरदार सोडून बाहेर रस्त्यावर येऊन बसले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details