नांदेड - कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतपर्धान नरेंद्र मोदींनी देशात 3 मेपर्यंत कडाऊन जाहीर केला आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या शेतमालासाठी खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या नाशवंत फळांचे मोठे नुकसान होत असल्याचे खासदार पाटील म्हणाले.
शेतमालासाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करा, खासदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - शेतमालासाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करा
अवकाळी पावसाने उन्हाळी ज्वारी, हळद , मका या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडे साठवण क्षमता नसल्याने हा माल खराब होण्याच्या तक्रारी शेतकरी माझ्याकडे करत असल्याचे पाटील म्हणाले.
अवकाळी पावसाने उन्हाळी ज्वारी, हळद , मका या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांकडे साठवण क्षमता नसल्याने हा माल खराब होण्याच्या तक्रारी शेतकरी माझ्याकडे करत असल्याचे पाटील म्हणाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वच प्रकारच्या मालाची खरेदी करण्यासाठी सरकारने खरेदी केंद्र सूरु करावीत. तसेच नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हजारो मजुर आहेत. या मजुरांची उपासमार टाळण्यासाठी हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक सुरू करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.