नांदेड -हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे सध्या नांदेड जिल्ह्यात अडकलेले पहायला मिळत आहे, आपल्या पत्नीच्या आमदारकीसाठी खासदार महोदयांना आपला मतदारसंघ सोडून इकडेच थांबावं लागत आहे. पाहूयात नांदेड दक्षिण मतदारसंघातील लढतीवर एक विशेष वृत्त...
शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील सध्या नांदेडमध्येच व्यस्त आहेत. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने नांदेड दक्षिण मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यामुळे हेमंत पाटील सध्या पत्नीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत आहेत.
हेही वाचा.... नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात 'मनधरणी' काउंटडाऊन सुरू
नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातुन 2014 साली सेनेचे हेमंत पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोली मतदारसंघातून उभे राहिले आणि विक्रमी मतांनी निवडून देखील आले. त्या नंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत पाटील यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. आता हेमंत पाटील हे नांदेड दक्षिण मतदारसंघात पत्नीसाठी प्रचार करत आहेत.