महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या पत्रकार भवनसाठी लागेल ती मदत करण्याची तयारी - खासदार चिखलीकर - महाराष्ट्र पत्रकार दिवस

नांदेडमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडचे पत्रकार भवन लवकर व्हावे. त्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी असल्याचे आश्वासन दिले.

nanded
पत्रकारदिनानिमित्त पत्रकार सोहळ्याचे आयोजन

By

Published : Jan 7, 2020, 10:18 AM IST

नांदेड -जिल्ह्यात पहिले पत्रकार भवन उस्मान नगरला आपण बांधून दिले असून नांदेडचे पत्रकार भवन लवकरात लवकर व्हावे. त्यासाठी लागणारी मदत करण्याची तयारी असल्याचे नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. ते पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

पत्रकारदिनानिमित्त पत्रकार सोहळ्याचे आयोजन

नांदेडच्या एमआयडीसी परिसरातील मंजू पॅलेस येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार चिखलीकर यांनी नांदेडचे पत्रकार भवन लवकरात लवकर तयार होण्याची ईच्छा व्यक्त केली. तसेच त्यासाठी लागेल ती मदत करण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.

नांदेड शहराची अवस्था राज्यात बिकट आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले. तसेच देगलूर नाका ते वाजेगाव उड्डाण पुलासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्ह्यात पहिल्यांदाच शहरासह ग्रामीण भागातील ५०० च्या वर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा - नांदेडमध्ये अवैध वाळू उपसा; प्रशासनाने केल्या तीन बोटी नष्ट

माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, वृत्तनिवेदक वृषाली यादव, महानगराध्यक्ष प्रवीण साले, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, अविनाश घाटे, जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी, अनिकेत कुलकर्णी, विनायक एकबोटे, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, ताहेर सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!

ABOUT THE AUTHOR

...view details