महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्धापूर-तामसा-हिमायतनगर महामार्ग व पूलाची खासदार चिखलीकर यांच्याकडून पाहणी - खासदार प्रताप पाटील चिखलीकर

गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धापूर-तामसा-हिमायतनगर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद आहे. या बंद पडलेल्या कामामुळे पावसाळ्यात वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होणार आहे. गुरुवारी खासदार चिखलीकरांनी या महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. व पावसाळ्यापूर्वी रखडलेल्या रस्त्याचे व पूलाचे काम पूर्ण करावेत, अशा सूचना सबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

अर्धापूर-तामसा-हिमायतनगर महामार्ग, पूलाची खा. चिखलीकरांकडू पाहणी
अर्धापूर-तामसा-हिमायतनगर महामार्ग, पूलाची खा. चिखलीकरांकडू पाहणी

By

Published : May 14, 2020, 2:59 PM IST

नांदेड - येथील तामसा-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या चौपदरीकरण व पुलाचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असून दोन महिन्यापासून रखडले आहे. गुरुवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची पाहणी केली. तसेच, पावसाळ्याआधी वाहतूक सुरू करण्यासाठी कामाची गती वाढवावी. तसेच सबंधित कामांना लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात सबंधितांना सूचना दिल्या.

अर्धापूर-तामसा-हिमायतनगर महामार्ग, पूलाची खासदार चिखलीकर यांच्याकडून पाहणी

गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र.२५७ रस्ता चौपदरीकरणाचे काम बंद आहे. या बंद पडलेल्या कामामुळे पावसाळ्यात वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होणार आहे. अर्धापूर-तामसा-हिमायतनर या राष्ट्रीय महामार्गाची कामे रूद्रानी कन्स्ट्रक्शन यांनी एका कंपनीला काम दिले आहे. रुद्राणी कंपनीने एका कंपनीला माती-काम करण्याचे काम दिले होते. मात्र, काम करत नसल्यामुळे त्या कंपनीचे काम रूद्रानी कंपनीने काम बंद केले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे काम रखडले आहे. परिणामी जनतेला रस्त्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या भागातून वाहनांची मोठी ये-जा असते, शेतकऱ्यांच्या केळींची मोठी वाहतूक पावसाळ्यात होते. नदीवरील पुलामुळे पाणी थांबत असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरत आहे. तात्पुरत्या पुलाची उंचीही कमी आहे. यामुळे, वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठया अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत भाजप कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी नांदेड मतदारसंघाचे खासदार चिखलीकर यांच्याकडे तक्रार केली होती. 'कोरोना' महामारीच्या संकटातही खासदार चिखलीकरांचे विकास कामावर बारकाईने लक्ष आहे. त्यांनी तत्काळ या बाबींची दखल घेत रखडलेल्या रस्त्याचे व पूलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत, अशा सूचना सबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, रस्ता चौपदरीकरण कामामुळे पावसाळ्यात शेतात पाणी शिरणार नाही याची दक्षता सबंधितांनी घ्यावी अशा सूचनाही यावेळी केल्या.

यावेळी माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख, नगरपंचायत गटनेते अ‌ॅड किशोर देशमुख, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, माजी सभापती बाबूराव हेंद्रे, माजी उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले, युवा नेते विराज देशमुख, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, शहराध्यक्ष विलास साबळे, कल्याणकर, प्रवक्ते रामराव भालेराव, अवधूत कदम, सचिन कल्याणकर, माधवसिंह ठाकूर, तुळशीराम बंडाळे, गोविंद लंगडे, कुश भांगे, नगरसेवक शिवराज जाधव, शैलेश लोमटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details