नांदेड -साई जन्मस्थानाच्या वादावर खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी शिर्डीकरांना आणि पाथरीकरांना वाद मिटवण्याची विनंती केली आहे. शिर्डी समाधीस्थान आणि पाथरी जन्मस्थान असल्याच्या नोंदी आहेत, असे ते म्हणाले. तसेच या वादात पडायचे नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर
साईबाबांच्या जन्मस्थान वादावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा वाद मिटवण्याची विनंती केली आहे. साईबाबांचे जन्मस्थान पाथरी, तर समाधीस्थान शिर्डी असल्याचे ते म्हणाले.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर
पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत, अशी माहिती चिखलीकर यांनी दिली.
संबंधित वाद मिटण्याची अपेक्षा असून, सरकारच्या माध्यमातून दोन्ही जागांचा विकास झाल्यास उत्तम होईल, असे मत त्यांनी मांडले आहे.
Last Updated : Jan 20, 2020, 4:24 PM IST