नांदेड - आईचे निधन झाल्यानंतरही एका मुलीने धीर धरत दहावीची परीक्षा दिली आहे. दिप्ती भास्कर लोखंडे असे या धैर्यवान मुलीचे नाव आहे. ती शाकुंतल विद्यालयात शिकते.
सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ३ मार्च रोजी दहावीचा पहिला पेपर झाला. दिप्ती दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. शिवाजी हायस्कूलमध्ये तिची परीक्षा सुरू आहे. पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशीच दिप्तीची आई आजारी पडली. तिच्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास दिप्तीच्या आईचे निधन झाले.