महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये १ हजार १५ संभाव्यांची नोंद; ७३७ नमुन्यांपैकी ६७७ निगेटिव्ह, ५३ जणांचा अहवाल प्रलंबित

नांदेडमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ झाली आहे. तर, १ हजार १६ संभाव्य व्यक्तींपैकी ७३७ जणांचे स्वॅब तपासणीकरता पाठवण्यात आले असून त्यातील ६७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर, ५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात १ हजार १५ संभाव्यांची नोंद
जिल्ह्यात १ हजार १५ संभाव्यांची नोंद

By

Published : Apr 28, 2020, 8:59 AM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण १ हजार १६ संभाव्यांची नोंद झाली आहे. यापैकी एकूण ७३७ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील ६७७ जण निगेटिव्ह तर, ५३ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आत्तापर्यंत एकूण ५ जणांच्या स्वॅब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.

आत्तापर्यंत स्वॅब घेण्यात आलेल्या ७३७ जणांपैकी २ रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहेत. नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगर येथील रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल २२ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण ८० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यानंतर, नांदेड शहरातील अबचलनगर येथील रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल २६ एप्रिल रोजी प्राप्त झाला असून या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे. तसेच त्याचा निकटवर्तीय संपर्कातील १६ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती (२७ एप्रिल, सायं. ५ पर्यंत)

▪️ एकूण पॉझिटीव्ह रुग्ण - 2

▪️ आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 884

▪️ क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 282

▪️ अजून निरीक्षणाखाली असलेले - 131

▪️ पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 68

▪️ घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 816

▪️ आज तपासणीसाठी नमुने घेतले- 49

▪️ एकूण नमुने तपासणी - 737

▪️ पैकी निगेटिव्ह - 677

▪️ नमुने तपासणी अहवाल बाकी - 53

▪️ नाकारण्यात आलेले नमुने - 5

▪️ जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 81 हजार 446 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details