नांदेड - खरीप हंगामसाठी जिल्ह्यातून मोठया प्रमाणात ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आले आहेत. अखेर दोन लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी ऑनलाईन मागणी अर्ज सादर केले आहेत. पेरणीचा हंगाम असल्याने संबंधित बँकांकडून पीक कर्ज देण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नांदेड जिल्ह्यात पीककर्जासाठी २ लाख ४३ हजार शेतकऱ्यांचे अर्ज - nanded farmer
कोरोना विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षित लागू व्हाव्यात, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्ज मागणी सुविधा उपलब्ध करून दिली होती. जिल्ह्यात एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदविली
कोरोना विषाणू संसर्ग टाळावा व बँकेच्या सेवा अधिक सुरक्षित लागू व्हाव्यात, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन कर्ज मागणी सुविधा उपलब्ध करून दिली होती. जिल्ह्यात एक लाख ७० हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीककर्ज मागणी नोंदविली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी ऑनलाईनसाठी ६ जूनपर्यंत मुदतवाढ दिली.
दरम्यान, ४ जूनपर्यंत जिल्ह्यात दोन लाख २० हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केले होते. ६ जूनची तारीख संपल्यानंतरही ऑनलाईन पोर्टल सुरू आहे. यामुळे सोमवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ही यादी जिल्हा अग्रणी बँक, नांदेडमार्फत संबंधित बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.