नांदेड- जिल्ह्यात रविवार (28 मार्च) 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 310 बाधित मिळून जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 39 हजार 908 एवढी झाली आहे. 18 जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 731 एवढी झाली आहे.
9 हजार 670 सक्रिय रुग्ण
आजच्या 4 हजार 299 अहवालांपैकी 2 हजार 850 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 3 लाख 1 हजार 387
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 55 हजार 87
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 39 हजार 908
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 29 हजार 273