नांदेड- जिल्ह्यात मंगळवारी (दि. 23 मार्च) प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालांपैकी 1 हजार 330 अहवाल कोरोनाग्रस्त आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 668 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
रविवार 21 मार्च 2021 रोजी कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवार 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे.