नांदेड- जिल्ह्यात आज (दि. 15 मार्च) 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहेच. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 27 हजार 371 एवढी झाली आहे. किनवट तालुक्यातील जुनातांडा येथील 85 वर्षांच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 हजार 625 सक्रिय रुग्ण