महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात आले 66 हजारांहून अधिक प्रवासी, सर्वांना घरातच राहण्याची प्रशासनाची सुचना - होम क्वारंटाईन

नांदेड जिल्ह्यात बाहेरुन प्रवास करुन आलेल्या तब्बल 66 हजार 881 प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईने शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना घरीच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Apr 6, 2020, 7:08 PM IST

नांदेड- जिल्ह्यात सुदैवाने अजून एकही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण आढळला नाही. तरीही प्रशासनाकडून बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. जिल्ह्यात बाहेरुन प्रवास करुन आलेल्या एकूण प्रवासी 66 हजार 881 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्केही मारण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सोमवार (दि.६ एप्रिल) सांयकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी (प्रवासी वगळून)

▪️ एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 0
▪️ आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - 441
▪️ क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 76
▪️ निरीक्षणाखाली असलेले - 25
▪️ 25 पैकी दवाखान्यात निरीक्षणामध्ये - 10
▪️ घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 320
▪️ आज तपासणीसाठी नमुने घेतले- 25
▪️ एकुण नमुने तपासणी- 141
▪️ पैकी निगेटीव्ह - 111
▪️ नमुने तपासणी अहवाल बाकी- 25
▪️ नाकारण्यात आलेले नमुने - 5

ABOUT THE AUTHOR

...view details