नांदेड - जलधारा येथील मका, ज्वारी केंद्रावर अंदाजे २००० क्विंटल ज्वारी खरेदीविना गोदामात पडून आहे. ज्वारी खरेदीस अद्यापपर्यंत मुदतवाढ मिळाली नाही, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गाची धाकधुक वाढली आहे. गेल्या ५४ दिवसात जलधारा केंद्रावर ३० हजार क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे.
जलधारा केंद्रावर २ हजार क्विंटल ज्वारी खरेदीविना पडून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली - ज्वारी खरेदीस मुदतवाढ
मका खरेदीस दि.१५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने मक्याची या केंद्रावर जोरात खरेदी सुरू आहे. परंतु ज्वारी खरेदीस फक्त ३० जूनपर्यंतच मुदत होती. ज्वारी खरेदीस पुढे मुदतवाढ मिळेल, या आशेने परिसरातील व तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी येथील केंद्रावरील रेणुका सहकारी सुतगिरणीच्या गोदामात ज्वारी साठवून ठेवली आहे. तर काही शेतकरी ज्वारी वाहनात ज्वारी घेऊन खरेदी केंद्रापुढे ज्वारी खरेदी कधी होणार या प्रतीक्षेत आहेत.
जलधारा येथे मका, ज्वारी खरेदीला यंदा प्रथमच मंजुरी मिळाली असून १८ मे ते १२ जुलैपर्यंत ५४ दिवसात ३० हजार क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली आहे. तर ज्वारी खरेदीस ३० जूनपर्यंतच मुदत असल्याने दि. ३० जूनपर्यंत या केंद्रावार ५ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी पूर्ण झाली. मका खरेदीस दि.१५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने मक्याची या केंद्रावर जोरात खरेदी सुरू आहे. परंतु ज्वारी खरेदीस फक्त ३० जूनपर्यंतच मुदत होती. ज्वारी खरेदीस पुढे मुदतवाढ मिळेल, या आशेने परिसरातील व तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी येथील केंद्रावरील रेणुका सहकारी सुतगिरणीच्या गोदामात ज्वारी साठवून ठेवली आहे. तर काही शेतकरी ज्वारी वाहनात ज्वारी घेऊन खरेदी केंद्रापुढे ज्वारी खरेदी कधी होणार या प्रतीक्षेत आहेत.
ज्वारी खरेदीस शेतकऱ्याने वारंवार मागणी करुनही मुदतवाढ मिळत नसल्याने या केंद्रावर साठवून ठेवलेल्या अंदाजे २ हजार क्विंटल ज्वारीची चांगलीच पंचायत झाली आहे. आधीच पावसाळ्याचे दिवस आणि शेतीच्या कामाची लगबग अशा कामाच्या दिवसातही शेतकऱ्यांना या गोदामाच्या केंद्रावर साठवून ठेवलेल्या ज्वारीसाठी बसून राहावे लागत आहे. अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे गोदामाला देखील गळती लागत असल्याने ज्वारी भिजून खराब होण्याची देखील चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. शासनाने ज्वारी खरेदीस मुदतवाढ देवून केंद्रावार साठवून ठेवलेल्या ज्वारीची खरेदी पूर्ण करावी, अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे होत आहे.