महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोकरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तिघांविरोधात अ‌ॅट्रोसिटीसह पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल - naded crime

नांदेड शहरातल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिघांविरुद्ध पोक्सो आणि अ‌ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत भोकर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

bhokar police station
भोकरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तिघांविरोधात अ‌ॅट्रोसिटीसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By

Published : Jun 2, 2020, 1:16 PM IST

नांदेड - शहरातल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचास गेली असता तिचा पाठलाग करीत विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्यावर तिघांविरुद्ध पोक्सो आणि अ‌ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत भोकर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी काल पहाटेच्या सुमारास शौचास गेली असता, एकाने मुलीचा पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. आरोपीसोबत असलेल्या दोघांनी पीडित मुलीच्या घरासमोर जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

घडलेल्या घटनेबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भोकर पोलिसांत कलम ३५४(५), ३२३, ५०४(३४) तसेच कलम १२ पोक्सोसह अ‌ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details