नांदेड - आपल्या समाजात शिक्षकांकडे नेहमी चांगल्या नजरेने पाहिले जाते. मात्र, आता शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या यशवंत महाविद्यालयातील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यपिकेकडे शरीरसुखाची मागणी केली ( molestation case register against principal nanded ) होती.
माजी मंत्री अशोक चव्हाणांच्या संस्थेतील धक्कादायक प्रकार! प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी - प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी
शवंत महाविद्यालयातील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यपिकेकडे शरीरसुखाची मागणी केली ( molestation case register against principal nanded ) होती.
माजी मंत्री अशोक चव्हाण यांची श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात डॉ. गणेशचंद्र शिंदे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्याच महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. गेल्या दोन वर्षा पासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. त्यांनी हात धरून शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी प्राचार्याविरोधात पीडीत महिलेने नांदेडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -Gang Rape In Nagpur District: अकरा वर्षीय मुलीवर आरोपींचा सामूहिक बलात्कार