महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे आढळले मोबाईल - नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे सापडला मोबाईल

नांदेडमध्ये तुरुंगातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बालाजी परसे आणि परमजीत सिंघ अशी कैद्यांची नावे आहेत.

Mobile found in prison
नांदेडमध्ये कारागृहातील दोन कैद्याकडे आढळले मोबाईल

By

Published : Jan 1, 2021, 3:13 PM IST

Updated : Jan 1, 2021, 3:22 PM IST

नांदेड -नांदेडमध्ये तुरुंगातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी परसे आणि परमजीत सिंघ नावाच्या कैद्याकडे मोबाईल फोन सापडले आहेत.

कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल
अचानक केलेल्या तपासणीत सापडला मोबाईल-वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली. मोबाईल बाळगणारे दोघे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस ठाण्यात दोन्ही कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चक्क तुरुंगात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने खळबळ उडालीय.मोबाईल आला कुठून ?कैद्यांची कारागृहात रवानगी करताना त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. त्यांच्याकडील आक्षेपार्ह वस्तू काढून घेतल्या जातात. मगच त्यांना आत सोडलं जातं. असं असताना देखील त्यांच्याकडं हे मोबाईल फोन नेमके आले कसे, याचा पोलीस शोध घेताहेत.
Last Updated : Jan 1, 2021, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details