महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा ही महत्वाची निवडणूक समजून कामाला लागा, आमदार रातोळीकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन - राम पाटील रातोळीकर बातमी

आमदार या नात्याने तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही. असे प्रतिपादन आमदार राम पाटील रातोळीकर यांनी अर्धापूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या प्रांगणात शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत केले.

आमदार राम पाटील रातोळीकर

By

Published : Aug 12, 2019, 6:29 PM IST

नांदेड- लोकसभेला भोकर मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. याची पक्षाला नक्कीच जाणीव आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच अनेक बूथ व शक्तिकेंद्रात भाजपला आघाडी मिळाली. निवडणुकीनंतर आपल्या बुथवरील पक्षाच्या आघाडीची दखल घेण्यात आली, असून विधानसभेलाही असेच काम करा. आमदार या नात्याने तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही. असे प्रतिपादन आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केले. अर्धापूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या प्रांगणात शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार राम पाटील रातोळीकर

पुढे बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील भाजपचे संघटन वाढल्यामुळे मतांची टक्केवारी वाढली आहे. देशातील केंद्र सरकारने व राज्य सरकारने चांगली कामगीरी केली. देशातील सर्वात शेवटच्या नागरिकांपर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचविला. विधानसभा ही महत्वाची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आतापासून ग्राऊंड निर्मिती करून ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे प्रभारी श्रीकांत देशपांडे यांनी पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला. तसेच भाजपचे सक्रिय सदस्य नोंदणी, बूथ कमिटी, राखी कार्यक्रम, पक्षाचे विविध कार्यक्रम राबविणे यासह विविध कामासंदर्भाने श्रीकांत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राम चौधरी, विधानसभा अध्यक्ष प्रविण गायकवाड, राजीव गंडीगुडे, दीपक सूर्यवंशी, निलेश देशमुख, भारतीताई पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, शहराध्यक्ष योगेश हळदे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामराम भालेराव यांनी केले तर प्रास्ताविक सुधाकर कदम व आभार राजाभाऊ राजेवार यांनी मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details