नांदेड - नांदेड लोकसभेसाठी भाजपा-शिवसेना युतीच्यावतीने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
नांदेड लोकसभा : चिखलीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन - नांदेड लोकसभा
भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप युतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जुना मोंढा टॉवर येथून सकाळी ११ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.
![नांदेड लोकसभा : चिखलीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2805557-563-56e7e510-a2b5-4b14-b121-60da4fe2e61a.jpg)
आमदार प्रताप पाटील चिखलीकर
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर
भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप युतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जुना मोंढा टॉवर येथून सकाळी ११ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मध्यवर्ती पक्ष कार्यालय गोदावरी कॉम्प्लेक्स आयटीआय येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्य सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.
Last Updated : Mar 26, 2019, 3:48 PM IST