महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नगररचना विभागाने नांदेड महापालिकेच्या विकास आराखड्यात टाकलेले आरक्षण रद्द करा' - बालाजी कल्याणकरट

आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले, "ज्या कारणासाठी आरक्षण ठेवलेली आहेत त्या खात्याने रितसर मागणी केलेली नाही. महापालिका व ग्रामपंचायतीने मंजूर आराखडा व अकृषिक आदेश असताना तेथे मुद्दाम व खोडसाळपणे आरक्षणे टाकली आहेत. या प्रारुपाविरोधात 3 हजार आक्षेप प्राप्त झाल्यामुळे केलेला आराखडा चुकीचा व नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहेत."

mla-balaji-kalyankar
आमदार बालाजी कल्याणकर

By

Published : Dec 22, 2019, 11:48 AM IST

नांदेड -नगररचना विभागाने नांदेड महापालिकेचा विकास आराखडा तयार करताना बिल्डर व काही विशिष्ट लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून गरज नसलेल्या जमिनीवर आरक्षण टाकल्याचा आरोप नांदेड उतर मतदारसंघाचे शिवसेनचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शनिवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात नागपूर येथे केला. महत्त्वाच्या व सार्वजनिक हिताच्या विषयावर सभागृहात सुरू असलेल्या औचित्याच्या मुद्यावर ते बोलत होते.

'नगररचना विभागाने नांदेड महापालिकेच्या विकास आराखड्यात टाकलेले आरक्षण रद्द करा'

हेही वाचा -अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा नाही - देवेंद्र फडणवीस


कल्याणकर म्हणाले, "ज्या कारणासाठी आरक्षण ठेवलेली आहेत. त्या खात्याने रितसर मागणी केलेली नाही. महापालिका व ग्रामपंचायतीने मंजूर आराखडा व अकृषिक आदेश असताना तेथे मुद्दाम व खोडसाळपणे आरक्षणे टाकली आहेत. या प्रारुपाविरोधात 3 हजार आक्षेप प्राप्त झाल्यामुळे केलेला आराखडा चुकीचा व नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहेत."

2004 साली महापालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने आराखड्याची तुर्तास गरज नाही. याबाबत महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेने हा आराखडा रद्द करण्याचा ठराव मंजूर केला आहे. नगरसेवक असताना सभागृहात आराखड्यास विरोध करण्यासाठी मला आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला, असाही उल्लेख कल्याणकर यांनी सभागृहात केला. नागरिकांचा आक्षेप व शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन हा विकास आराखडा तात्काळ रद्द करा, अशी मागणी कल्याणकर यांनी यावेळी केली आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघात स्वतंत्र रुग्णालय द्या -

नांदेड उत्तर मतदारसंघातील रुग्णांना 15 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोनशे रूपये खासगी वाहनाला द्यावे लागतात नंतरच विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात पोहचता येते. ही गैरसोय दूर करण्यासाठी उत्तर मतदारसंघात आंतररुग्ण कक्ष व शंभर खाटांच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी कल्याणकर यांनी यावेळी केली.

हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी भ्रमनिरास करणारी, सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन - रघुनाथ पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details