महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण; शंकरनगर येथे कडकडीत बंद, साईबाबा विद्यालायवर दगडफेक

पोलिसांनी आंदोलकांना वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काल २ जानेवारीला सकाळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध पक्षातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

By

Published : Jan 21, 2020, 9:29 AM IST

Updated : Jan 21, 2020, 10:37 AM IST

nanded
दोशींना शिक्षेची मागणी करताना मोर्चेकरी

नांदेड- शंकरनगर येथील श्री. साईबाबा प्राथमिक विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराचे या परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत. विद्यार्थी संघटनेच्या काल २ जानेवारीला दिलेल्या बंदच्या आवाहनास नागरिकांनी जोरदार प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. यावेळी संतप्त लोकांनी श्री. साईबाबा प्राथमिक विद्यालयाच्या दोन मजली इमारतीवर तुफान दकडफेक केली.

मोर्चा व बंदचे दृश्य

पोलिसांनी आंदोलकांना वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काल २ जानेवारीला सकाळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध पक्षातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. सहवीतील बालिकेवर अत्याचार करणारे दयानंद राजुळे, शेख रसूल हे शिक्षक तसेच याबाबत तत्काळ कारवाई न करणारे प्राचार्य शेळके, प्रदीप जाधव आणि महिला अरोपीस तात्काळ अटक करून फाशी देणे, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून तातडीने न्याय मिळवून देणे, मुलीच्या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करणे, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावरही गुन्हा दाखल करणे, अशा मागण्या सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भरांडे, चंद्रप्रकाश देगलूरकर, नागसेन जिगळेकर, रावसाहेब पवार, प्रकाश कामळजकर यांनी आपल्या भाषणात केल्या. दलित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांसह या गंभीर प्रकरणातील पाचही आरोपींना चार दिवसाच्या आत अटक करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही रामचंद्र भरांडे यांनी दिला आहे.

हेही वाचा-तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना ३ वर्ष सक्तमजुरी अन् दंडाची शिक्षा

Last Updated : Jan 21, 2020, 10:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details