नांदेड - मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बिहारीपूर येथील रहिवासी सिद्धार्थ माधव सोनवणे (वय १७) हा तरुण म्हशीसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. तो घरी परत आलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता रवीवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बिहारीपूर शिवारात एका शेतात लिंबाच्या झाडाला सिद्धार्थने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आढळून आले.
अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, मुखेड तालुक्यातील घटना - Nanded Police News
मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वनमाला माधव सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद रण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे करत आहेत.