महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोबोट सारखे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण केंद्र महत्त्वाचे - पालकमंत्री अशोक चव्हाण - नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण

श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या केंद्राची माहिती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र नवीन दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला.

नांदेड
नांदेड

By

Published : Feb 13, 2021, 10:25 PM IST

नांदेड- भविष्यातील जगाच्या गरजा या पूर्णत: अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत होत चालल्या आहेत. या क्षेत्रातील संशोधन व माणसांच्या कल्पनांनुसार ज्या गरजा दृष्टीपथात आहेत त्याचे आविष्कार व प्रात्याक्षिक शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच अभियांत्रिकी संस्थांमधून देणे गरजेचे आहे. श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्र हे यादृष्टीने मोठे योगदान देईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या केंद्राची माहिती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र नवीन दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला.

हे केंद्र नवीन दिशा देईल - उदय सामंत

श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातील औद्योगिक यंत्र मानव प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या केंद्राची माहिती घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र नवीन दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला.

याचबरोबर आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ, श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, सहसंचालक प्रा. महेश शिवणकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details