महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ देणार नाही'

देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी साहित्यिकांची वैचारिकता अत्यंत महत्त्वाची आहे .साहित्यिक देशाला योग्य दिशेने नेत असतात. साहित्यिकांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे काळाची गरज आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

बोलताना मंत्री अशोक चव्हाण
बोलताना मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Mar 2, 2020, 9:52 AM IST

नांदेड- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकार 'हम करे सो कायदा' करत नागरिकांची मुस्कटदाबी करत आहे. देशाचे संविधान धोक्यात आले आहे. साहित्यिक, विचारवंत यांना आपले विचार व्यक्त करण्याची मुभा राहिलेली नाही. केंद्र सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असली तरी महाराष्ट्रात मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ देणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

बोलताना मंत्री अशोक चव्हाण

येथील कुसुम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शंकर साहित्य दरबार या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कवी लहू कानडे, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, कौतिकराव ठाले पाटील, शंकर साहित्य दरबारचे समन्वयक जगदीश कदम उपस्थित होते.

पुढे मंत्री चव्हाण म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण हे साहित्यप्रेमी होते. साहित्यिकांना सन्मानित करण्याची त्यांना मुळात आवड होती. स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत साहित्यिकांचे लेखन महत्त्वाचे आहे. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी साहित्यिकांची वैचारिकता अत्यंत महत्त्वाची आहे .साहित्यिक देशाला योग्य दिशेने नेत असतात. साहित्यिकांचे स्वातंत्र्य अबाधित राहणे काळाची गरज आहे.

हेही वाचा -नांदेड : हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

ABOUT THE AUTHOR

...view details