नांदेड - नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार असतील, असे संकेत नामदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना ज्याप्रमाणे पांडुरंग पावला, त्याचप्रमाणे राजश्री पाटील यांना रुख्माई पावावी. यासाठी मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्यास तयार असल्याचेही खोतकर यावेळी म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील १२ वर्षापासून शहरात अखंडपणे सुरु असलेल्या आषाढी महोत्सवात आजपर्यंत अनेक राजकीय लोकप्रतिनिधी, सिनेकलावंतांनी हजेरी लावली. शंकरराव चव्हाण सभागृहात सुरु असलेल्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे उद्धाटन शनिवारी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार, मंत्री अर्जुन खोतकरांचे संकेत पुढे खोतकर म्हणाले, की हिंगोलीचे खासदार म्हणून दिल्लीच्या पार्लमेंटमध्येसुद्धा हेमंत पाटील यांच्यातील उत्तम गुणांची चुनूक पाहायला मिळेल. जिल्ह्याच्या गंभीर प्रश्नावर ते आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देतील, असेही खोतकर म्हणाले. राजश्री पाटील यांना अगामी काळात राजकारणात येऊन जनतेची सेवा करता यावी, यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी आपली मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्याची तयारी असल्याचे खोतकर म्हणाले.
कमळाचा धर्म विसरले नाही - प्रितम मुंडे
यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी मनोगत वक्त करताना शिवसेना आणि भाजपची युती असल्याने सेनेच्या कार्यक्रमात आपन वेगळे दिसू नये म्हणून शिवसेनेच्या भगव्या रंगांची कपडे परिधान केली आहेत. पण कमळाचा धर्म विसरलो नसल्याचे वक्तव्य खासदार प्रितम मुंडे यांनी केले. प्रितम मुंडेंनी अंगावरच्या कपड्यावर कमळाचे फुल असल्याचे दाखवून दिल्याने प्रेक्षकात एकच हशा पिकला. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, मुक्तेश्वर धोंडगे, आसाराम बोराडे, पंडीत घुगे, दादाराव करपे , मनपा विरोधी पक्षनेत्या गुरुप्रीत कौर सोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.