महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमची उडी..! - nanded election latest news

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसह आता एआयएमआयएम देखील रिंगणात उतरली आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातून चांगली मते मिळाल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज

By

Published : Dec 27, 2020, 12:23 PM IST

नांदेड -ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसह आता एआयएमआयएम देखील रिंगणात उतरली आहे. एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांनी विभागातील सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

शहरी भागापूरता पक्ष अशी ओळख पुसणार का?
एआयएमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन या पक्षाची ओळख केवळ शहरी भागात मर्यादित आहे. महाराष्ट्रात एमआयएमचे मुस्लिम बहुल भागात नगरसेवक आणि आमदार निवडून आले आहेत. हा पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातून चांगली मते मिळाल्याचा दावा एमआयएमकडून करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज
वाजेगाव ग्रामपंचायतीमध्ये पॅनल तयारनांदेडसह मराठवाड्यात एमआयएम आपले कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. अशी माहिती फिरोज लाला यांनी दिली आहे. नांदेड शहरालगत असलेल्या वाजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएमकडून पॅनल तयार करण्यात आले आहे.किती ग्रामपंचायतीवर मिळवणार वर्चस्व?ग्रामपंचायत निवडणुका थेट राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरी प्रत्येक पॅनल राजकीय पक्षाकडून पुरस्कृत असते. एमआयएमने देखील अशा पॅनलची तयारी केली आहे. मराठवाड्यातील किती ग्रामपंचतींवर एमआयएम आपले वर्चस्व सिद्ध करेल हे निकालानंतरच समोर येणार आहे.

हेही वाचा -संघराज्यांचा 'तो' विचार मारला तर रशियाप्रमाणे भारतातही राज्ये फुटतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details