नांदेड -गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्याचा परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. उलट दुधाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. पण उलट जनावरांची वैरण व खल्ली (पेंड) महागली आहे. वैरण 5 ते 10 रुपयाला मिळणारी पेंडी चक्क 10 ते 20 रुपयांपर्यत वाढली आहे. तर पेंढ पूर्वी 1800 रुपये क्विंटल मिळायची मात्र आत्ता 2800 रुपयापर्यंत भाव झाला आहे. महागाई प्रचंड वाढली असताना दुधाला भाव नाही. गायीच्या दुधाचा भाव केवळ 29 रुपये तर म्हशीच्या दुधाचा भाव चाळीस रुपये मिळत आहे.
दूध व्यवसाय न परवडणारा..!
शेतीला जोडधंदा असणारा दुग्धव्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. दुधाला सध्या सरासरी ३० रुपये लिटर इतका अत्यल्प भाव मिळत आहे. तर गुरांना लागणारा चारा आणि इतर खाद्य यांचे दर भडकलेले आहेत. त्यामुळे दुग्धव्यवसाय आता न परवडणारा धंदा झाला आहे. लॉकडाऊनमुळे दुधाचा व्यवसाय मोडकळीस आला आहे.
हे ही वाचा -छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर.
जोडधंदा केवळ नावालाच अन संकटात -
शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून संपूर्ण देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातल्याने देशात तब्बल 80 दिवस लॉकडाऊन होता. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकर्यांना बसला.