नांदेड- शहरामध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या बंगाल येथील कामगारांनी आम्हाला आमच्या गावी जावू द्या, अशी मागणी केली आहे. लाॅकडाऊनमुळे हातचे काम गेले असल्याने हे कामगार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना गावाकडे जायचे आहे.
आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या... हेही वाचा-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवानांना वीरमरण, ७ जखमी
नांदेड शहरामध्ये बंगाल राज्यातील सुमारे 1 हजार 200 च्या जवळपास सोने कारागीर आहेत. लाॅकडाऊनमुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास दीड महिन्यापासून काम बंद आहे. ते कधी सुरू होईल काही सांगता येत नसल्याने कामगारांना धीर सुटत आहे. त्यामुळे गावागडे परत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही.
या कामगारांनी आज घराबाहेर येऊन हातात फलक घेऊन आपल्या गावी जाण्याची मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केली आहे.