महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरी जाण्याचा पास पाहिजे?... मग भरा 'या' ठिकाणी माहिती

लॉकडाऊनमुळे बाहेर अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सशर्त परवानगी मिळाली आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन घरी जाण्याचा पास मिळणार आहे. त्यामुळे रेड झोन वगळता इतर झोनमधील नागरिकांना घरी परतता येणार आहे.

migrant-workers-students-will-going-to-his-home
migrant-workers-students-will-going-to-his-home

By

Published : May 3, 2020, 1:26 PM IST

नांदेड- लॉकडाऊनमुळे बाहेर अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सशर्त परवानगी मिळाली आहे. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन घरी जाण्याचा पास मिळणार आहे. त्यामुळे रेड झोन वगळता इतर झोनमधील नागरिकांना घरी परतता येणार आहे.

हेही वाचा-भिवंडी ते गोरखपूर विशेष श्रमिक ट्रेन 1104 कामगारांना घेऊन मध्यरात्री रवाना

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform?usp=sf_link या लिंकवर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.


तसेच जिल्हाबाहेरी विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना नांदेड जिल्ह्यातील आपल्या मूळगावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSed_VJMqAm5aTWZ-t7nFf8Gp8mvvAEc9AibJrzbydMZ0Tq63w/viewform?usp=sf_link या लिंकवर माहिती भरायची आहे.


संबंधितांनी सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा, राज्यातील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी 02462-249279, 02462- 235077 हे दूरध्वनी क्रमांक आणि collectornanded1@gmail.com हा इमेल आयडी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details