नांदेड - मुक्रमाबादच्या सावरमाळ येथे एका मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी - लैंगिक अत्याचार न्यूज
सावरमाळ येथे एका मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेतून ही तरुणी गरोदर राहिल्याने पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी धनाजी सादगिरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा -हत्या करुन घराला कुलूप लावले, 11 दिवसानंतर घटना उघडकीस
सावरमाळ येथील धनाजी सादगिरे याने एका वीस वर्षीय मनोरुग्ण तरुणीला चार महिन्यांपूर्वी आपल्या शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेतून ही तरुणी गरोदर राहिल्याने पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी धनाजी सादगिरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून मुखेडच्या न्यायालयात हजर केले.