नांदेड- शहरातील इतवारा भागातील गाडीपूरा येथे सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेला माहेरहून 2 लाख रूपये व अॅटो घेवून ये, म्हणून सासरचे तिला सतत शिवीगाळ व मारहाण करत होते. सविता अनिलसिंह ठाकूर (वय-30) असे या खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
नांदेडमध्ये विवाहितेचा खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - women murder in Nanded
याप्रकरणी उषाबाई ओमप्रकाश ठाकूर, (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये विवाहितेचा खून
हेही वाचा - मुखेड मतदारसंघात ‘आता हवा बदल नवा’ हाच नारा
याप्रकरणी उषाबाई ओमप्रकाश ठाकूर, (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सासरच्या लोकांनी सदरील महिलेचा गळा आवळून खून करून तीने फाशी घेतली, असे दाखवण्याचा बनाव केला होता. तर सविताला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक गिते यांनी सांगितले.